Nitin Desai News : रायगड : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणामध्ये ज्या कंपनीचे नाव सातत्याने समोर येतंय, त्या एआरसी एडलवाईज कंपनीने आपल्यावर होणाऱ्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देणारे पत्रक जारी केले आहे. याचदरम्यान आता नवीन अपडेट समोर येत आहे. एडलवाईजचे संचालक रासेश शाह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली आहे. (Nitin Desai News)
उच्च न्यायालयात धाव घेतली
नितीन देसाई यांच्यावर २५० कोटींचे कर्ज असल्याने तर ज्यांनी कर्ज दिले त्यांनी दबाव टाकल्यानेच देसाई यांनी आत्महत्येचं पाऊल उचल्याचे बोलले जात आहे. तर त्यावरून देसाई यांच्या कुटूंबाने देखील त्यावरून आरोप केले आहेत. यानंतर देसाई यांच्या पत्नी नेहा यांच्या फिर्यादीवरून कर्ज कंपनी ईसीएल फायनान्स आणि एडलवाईससह ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. तर आज या सर्वांना रायगड पोलिसांनी चौकशीसाठी कागदपत्र घेऊन हजर राहण्याच्या नोटीशी पाठवल्या होत्या. या एफआयआरमध्ये एडलवाईस एआरसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर.के. बन्सल, संचालक रासेश शाह, स्मित शाह, केयूर मेहता आणि जितेंद्र कोठारी यांचा समावेश आहे.
याप्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे. याचदरम्यान आता नवीन अपडेट समोर येत असून एडलवाईसचे संचालक रासेश शाह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, विधानसभा सभागृहात आशिष शेलारांनी नितीन देसाईंवरील कर्जाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दुसरीकडे, विधानपरिषदेत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. मात्र, यावेळी त्यांनी नितीन देसाईंवरील कर्जाचा आकडा सांगितला. प्रवीण दरेकर यांनी नितीन देसाईंसोबत आपल्या बैठकाही झाल्याचे नमूद केले होते. दरेकर म्हणाले की, माझ्या त्यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या होत्या. त्यांचे कर्ज १५० कोटी होते. पण ते २५० कोटींवर गेले आहे. मागील ३ ते ४ महिन्यांत माझ्या पाच ते सहा बैठका झाल्या. कर्जाची चौकशी झाली पाहिजे. व्याजावर व्याज लावले गेले. त्याच्या स्टुडिओवर जप्तीची प्रक्रिया आली म्हणून त्याने आज मृत्यूला कवटाळले. त्यांना नोटिसा कशा गेल्यात, त्याला कुणी प्रेशर केलं, याची चौकशी व्हायला हवी. (Nitin Desai News)
मी मुख्यमंत्र्यांना फोन केला. एक मराठी माणूस आहे, त्याने साम्राज्य उभं केलंय. राज्य सरकारने एनडी स्टुडिओवर ताबा घ्यावा, असे देसाईंनी रेकॉर्डमध्ये म्हटलं आहे. या सर्व लोकांची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे. आत्महत्या ही चिंता करायला लावणारी आहे. कुठली फायनान्स कंपनी आहे ते बघायला हवे. नितीन देसाई यांचा स्टुडिओ पाडू नये, सरकारने तो आपल्या ताब्यात घ्यावा, असे दरेकर यांनी सांगितले.