NIA Raid in Maharashtra : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) राज्यातील अमरावती आणि भिवंडी शहरात मोठा छापा टाकला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने या शहरांमध्ये छापा टाकून एका, एका असे दोन व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. भिवंडीतील खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात एनआयएचे पथक दाखल होऊन एका व्यक्तीस तब्यात घेतले आहे. तर अमरावती शहरातून ताब्यात घेतलेला व्यक्ती हा पाकिस्तानी संघटनेच्या सपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. त्या तरुणाची कसून चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहराच्या छाया नगरामध्ये राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ची बुधवारी (दि.11) रात्री पोहचली होती. एनआयएच्या टीमने एका 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर एनआयएची टीमने त्या तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. सध्या या तरुणाची अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आला आहे. दरम्यान, या तरुणासंदर्भात अधिका माहिती पोलीसांना मिळालेली नाहीत.
याबरोबरच, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ची टीम भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात पोहचली होती. त्यावेळी गुरुवारी पहाटेच्या दरम्यान आलेल्या एनआयएने एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. त्या संदर्भातील अधिक माहिती स्थानिक पोलिसांकडे अद्याप मिळालेली नाहीयेय.