New Delhi News : नवी दिल्ली : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीगीर महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांना या पदावरुन हटवण्याचीही मागणी केली आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. ते अद्यापही थांबलेलं नाही. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. बृजभूषण यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये लैंगिक शोषणापासून ते छेडछाडीसह सात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (touch where not wanted; Brijbhushan Singh’s FIR exposes ‘these’ serious matters)
बृजभूषण सिंह यांच्यावर एकूण सात गंभीर आरोप
बृजभूषण सिंह यांच्यावर एकूण सात गंभीर आरोप केले आहे. त्यात छेडछाड केल्याची तक्रार करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, बहाना करून छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, छातीपासून पाठीपर्यंत हात फिरवणे आणि पाठलाग करणे आदी गंभीर आरोप बृजभूषण यांच्यावर करण्यात आले आहेत. (New Delhi News) या प्रकरणातब्रिजभूषण सिंह व सचिव विनोद तोमर हे मुख्य आरोपी आहेत. विनोद तोमर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विनयभंगाच्या दहा तक्रारी करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी सात कुस्तीपटुंनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.पहिल्या महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवायला बोलावलं. त्यानंतर आपल्या मेजावर बसवून स्पर्श केला. छातीपासून पोटापर्यंत स्पर्श केला. शरारीच्या इतर अंगानाही स्पर्श केला. (New Delhi News) माझ्या पायाला पायानेही स्पर्श केला. माझ्या श्वासाचा पॅटर्न समजण्यासाठी चुकीचे स्पर्श केले, असं या महिलेने म्हटलं आहे. सहाही महिलेने अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. जबरदस्ती खेचणं, अंगाला हात लावणं, चुकीचा स्पर्श करणं आदी गंभीर आरोपांचा यात समावेश आहे.
जखमी महिला खेळाडूचा खर्च असोसिएशनने उचलण्यासाठी त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. खेळाडूंनी यास नकार दिला असता त्यांनी चाचणीमध्ये त्यांच्याशी भेदभाव केला, असे तक्रारीत म्हटलं आहे. ब्रिजभूषणने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा लैंगिक शोषण केले.(New Delhi News) कथितपणे टी-शर्ट काढले. श्वास तपासण्याच्या नावाखाली अयोग्यरित्या स्पर्श केला, असा आरोप एका कुस्तीपटुंने केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
New Delhi News : नवीन संसदभवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीय धर्मगुरूंकडून मंत्रोच्चारासह आशीर्वाद