सोलापूर : राष्ट्रीय तपास संस्था पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पॉप्युवर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने नाशिक पुण्यानंतर राज्यातील औरंगाबाद, ठाणे, सोलापूर, नांदेड, सोलापूर, जालना आणि परभणी येथे छापेमारी केली आहे. या छापेमारीत पॉप्युवर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयित कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात एकाच वेळी एनआयएने,एटीएस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने छापे टाकले आहेत. सोलापूरमधून पॉप्युवर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका संशयिताला राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक करण्यात आली आहे. तर एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच औरंगाबाद शहरातून १४ जणांना, तर ठाण्यातून एका संशयित कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आणि अटक करण्यात आलेल्या संशयित कार्यकर्त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने कारवाईचा दुसरा राऊंड सुरू केला आहे. एनआयएने केरळमधून पीएफआय सदस्य शफिक पैठला अटक केली होती. त्यामुळे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा रॅली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या निशाण्यावर असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले होते.
राष्ट्रीय तपास संस्थेने ८ राज्यांमध्ये २५ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. राष्ट्रीय तपास संस्था, ईडी आणि एटीएस आत्तापर्यंत ९५ ठिकाणी छापे टाकून १०६ पॉप्युवर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.