Nanded News : नांदेड : तरुण पीढीला मोबाइलने चांगलेच झपाटले आहे. मोबाइलच्या दुष्परिणामांमुळे कुटूंबातील संवादाची जागा वादाने घेतली आहे. मोबाइलमुळे अनेक ठिकाणी वादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मोबाइल घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना नांदेडलगतच्या गोपाळचावडी भागात घडली. मोबाईलकरिता एका २३ वर्षीय भावाने त्याच्या २० वर्षीय लहान भावाचा साडीने गळा आवळून खून केला. नांदेडच्या सिडको वसाहती शेजारील गोपाळ चावडी येथे हा पक्रार घडला आहे.
गोपाळचावडी भागातील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन राजू गवळे याने रविवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास मोठा भाऊ करण राजू गवळे यास मोबाईल मागितला. मात्र, त्याने नकार दिल्याने दोघा भावांमध्ये वाद झाला. (Nanded News) रागाच्या भरात करण याने अर्जुनचा साडीने गळा आवळून खून केला, असा आरोप मयत अर्जुन गवळे याचे मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे (रा. सिध्दार्थनगर, नांदेड) यांनी केला. याप्रकरणी आज वाघमारे यांनी तक्रार दिली असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार सपोउपनि. धनंजय देशमुख व मदतनीस माधव स्वामी यांनी दिली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व सपोनि. सुरेश थोरात व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
या प्रकरणी मृत अर्जुनचा मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे यांच्या तक्रारीवरुन सोमवारी ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढीस तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nanded News : जंगली रमी खेळून किती पैसे कमावलेस? नांदेडच्या तरुणाचा अजय देवगणला पत्राद्वारे सवाल!
Pune Accident : भीषण अपघाताने पुन्हा पुणे हादरले! इनोव्हा-पिकअपच्या धडकेत ५ ठार 2 जखमी…!