Nagar News : अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती पत्नीचे भांडण झाल्याने रागाच्या भरात नराधम पित्याने त्याच्या दोन पोटच्या मुलांना विहिरीत फेकून दिले. त्यानंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेत दोन चिमूकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आरोपी बाप वाचला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने आळसुंदे गावात खळबळ उडाली.
अहमदनगर जिल्ह्यातील घटना
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोकुळ क्षीरसागर (वय ३८, रा. आळसुंदे, कर्जत) असे आरोपी पित्याचे नाव आहे. तर ऋतुजा (वय ८) आणि वेदांत (वय ४) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांची नावे आहेत. रविवारी दुपारी पती-पत्नीचा वाद झाला होता. (Nagar News) हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात बापानेच आपल्या मुलांना विहिरीमध्ये ढकलून दिले. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये बाप वाचला, तर दोन्ही निष्पाप चिमुकले दगावले.
गोकुळ क्षीरसागर याला दारुचे व्यसन होते. यामुळे त्यांची भांडणे होत होती. दरम्यान, रविवारी देखील गोकुळचे त्याच्या पत्नीशी कडक्याचे भांडण झाले. हे भांडण टोकाला गेले. या भांडणाच्या रागात गोकुळ क्षीरसागर याने आपल्या ऋतुजा आणि वेदांत या मुलांना जवळच्या विहिरीत फेकले. (Nagar News) यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकूण गावकरी घटनास्थळी धावत गेले. ग्रामस्थांनी मुलांना बाहेर काढले. मात्र, दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, मुलांच्या निर्दयी बापावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्जत पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : टेम्पोचालकाला लुटणारे दोघे अटकेत ; कोतवाली पोलिसांची धडक कारवाई
Nagar News : चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला कोतवाली पोलीसांनी ठोकल्या बेड्या