Nagar News : अहमदनगर : माळीबाभुळगाव (ता. पाथर्डी) हद्दीतील दीपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहिरीत एकाचवेळी चार मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. (Nagar News)
नांदेडच्या करोडी भागातील धम्मपाल सांगडे हा पत्नी कांचन, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दीपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करीत होता. (Nagar News) धम्मपालची पत्नी कांचन आणि मुलांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. (Nagar News)
धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सांगडे, मुलगी निषीधा सांगडे, संचिता सांगडे हे पोल्ट्रीफार्मवर राहत होते. धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला होता. (Nagar News) यावेळी इतरांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला. रात्री झोपल्यानंतर पुन्हा नवरा-बायकोत वाद झाल्याचे शेजारी राहणाऱ्यांनी सांगितले. (Nagar News)
त्यानंतर सकाळी पोल्ट्रीफार्मवर काम करणारा एकजण विहिरीवर मोटार सुरू करायला गेला होता. (Nagar News) तेव्हा निषीधा सांगडे हीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. पोल्ट्री फार्मचे चालक दीपक गोळक यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत याबाबतची माहिती दिली. (Nagar News)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत तीस ते पस्तीस फूट पाणी होते. वीज पंपाच्या सहाय्याने पाणी उपसले तेव्हा कांचन सांगडे, निखील सांगडे, संचिता सांगडे या तिघांचे मृतदेह सापडले. (Nagar News)
दरम्यान, कांचन आणि तिची तिन्ही मुले विहिरीत मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलीस करीत आहेत. (Nagar News)