Nagar News : कोतवाली, (नगर) : मंगल कार्यालयात लावलेल्या कपड्यांच्या सेलमध्ये चोरी करणाऱ्या ४ महिलांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ५८ हजार रुपयांचे चोरी केलेले कपडे हस्तगत केले आहेत.
५८ हजार रुपयांचे चोरी केलेले कपडे हस्तगत
नंदा विलास इंगळे (रा. सिध्दार्थनगर झोपडपटटी अहमदनगर) शितल रवि भुजग (वय ३२) पुजा अविनाश काकडे (वय २८, (रा. दोघीही, सर्व सिध्दार्थनगर झोपडपटटी अहमदनगर), नंदा अरुण घोडके (वय ४५, रा. भोसले आखाडा, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम नागेश कोमाकुल (वय- २७ वर्षे, रा. माळीवाडा शिवम टॉकीज चौक अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर शहरातील केशर गुलाब मंगल कार्यालयात शनिवारी (ता. ०५) कपड्यांच्या सेलमध्ये लावलेल्या स्टॉल मधून कपड्यांची चोरी झाल्याची फिर्याद शुभम कोमाकुल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. (Nagar News)
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. मंगल कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे नंदा विलास इंगळे या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने इतर तीन महिलांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेले ५८ हजार रुपये किमतीचे कपडे आरोपी महिलांच्या घरून हस्तगत करण्यात आले आहेत. (Nagar News)
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज महाजन, पोलीस हवालदार नितीन गाडगे, वसंत सोनवणे, पोना रविंद्र टकले, शाहीद सलीम शेख, प्रमोद लहारे, सुमीत गवळी, दिपक रोहकले तसेच सायबर सेल दक्षिण विभागाचे पोलीस हवालदार राहुल गुंडू यांनी केली. (Nagar News)