Nagar News अहमदनगर : गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका अट्टल आरोपीला कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गावठी कट्टा बाळगणाऱ्यावर कोतवाली पोलिसांची महिनाभरातील ही दुसरी कारवाई केली आहे. (Nagar News) त्यामुळे कोतवाली पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. (Nagar News)
सुनिल मच्छिंद्र चव्हाण (वय ४०, रा. बाजारतळ, आष्टी जि.बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून मोटारसायकलीसह सुमारे ६२ हजार रुपयांच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ आसाराम राऊत यांनी सरकारच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Nagar Crime)
कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर शहरातील कै.माजी खाजदार दिलीप गांधी यांच्या घराजवळील आनंदधाम गेट येथे एक इसम संशयितरित्या मोटरसायकलवर थांबलेला असून त्याच्या कंबरेला गावठी कट्टा आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.(Nagar Crime)
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपी सुनिल चव्हाण याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी कट्टा व मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली.(Nagar Crime)
याप्रकरणी पोलीस शिपाई सोमनाथ आसाराम राऊत यांनी सरकारच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सुनिल चव्हाण याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.(Nagar Crime)
दरम्यान, आरोपी सुनिल चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात (जि.बीड) चोरी घोरपडी व अवैध दारू विक्रीचे ३ गुन्हे दाखल आहेत.(Nagar Crime)
हि कामगिरी कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, मनोज महाजन, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, रविंद्र टकले, अभय कदम, सतिष शिंदे, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे, सतिष भांड, संतोष जरे यांच्या पथकाने केली आहे.(Nagar Crime)