Nagar News : अहमदनगर : अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवर सोमवारी मध्यरात्री तलवारीने वार करून एका तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात त्याचा मित्र या हल्ल्यात जखमी झाला आहे. या घटनेमुळे अहमदनगर हादरले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अवैध धंद्यांची माहिती देत असल्याच्या संशयावरून हल्ला
ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय २४ वर्षे रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) यामध्ये ठार झाला असून शुभम पाडोळे हा जखमी झाला आहे. पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Nagar News) पोलिसांनी अवैध धंद्यांची माहिती देत असल्याच्या संशयावरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. बालिकाश्रम रोडवर वाढदिवसाची पार्टी सुरू असतानाही ही घटना घडली.
या प्रकरणी ओंकार रमेश घोलप (रा. माणिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गणेश केरुप्पा हुच्चे, नंदु बोराटे व संदिप गुडा यांच्याविरूदध गुन्हा दाखल केला आहे. (Nagar News) गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ओंकार भागानगरे याने पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी मध्यरात्री बालिकाश्रम रोडवर नीलक्रांती चौकापासून जवळच ही घटना घडली. यातील मृत भागानगरे आणि त्याचे मित्र त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करीत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. (Nagar News) त्यांनी भागानगरे आणि पाडोळे यांच्यावर तलवारीने सपासप वार केले. यामुळे धावपळ उडाली. मित्र आणि नातेवाईंकांनी ओंकार भागानगरे व पडोळे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. तोपर्यंत भागानगरे याचा मृत्यू झाला होता. पडोळे याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकलींची चोरी करणार अट्टल चोरटा जेरबंद