पुणे : जुनी भांडणे मिटवण्याच्या कारणावरून तरुणावर टोळक्याने खुनी हल्ला केल्याची घटना धनकवडी परिसरातील अॅक्सीस बँकेच्या पाठीमागे घडली असून याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
करण श्रीनिवास पाटील (वय- २०, रा. धनश्री अपार्टमेंट समोरील बिल्डींग, दुसरा मजला, बालाजी नगर, धनकवडी), विवेक बाबुराव चोरगे( २४, रा. सर्व्हे नं. 23/02, बालाजीनगर धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी आकाश रामलाल रजक (वय-२४, रा. झांबरे बिल्डींग, शॉप नं. २, काशिनाथ पाटील नगर, बालाजीनगर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश यांचा भाऊ अभिषेक याला त्याच्या ओळखीचा विवेक चोरगे याने फोन करून ठाकुर पान शॉप येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बोलावुन घेतले. आरोपी करण पाटील आणि त्याच्या इतर मित्रांसोबत असलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात ठेवुन आरोपींनी अभिषेकला मारहाण करण्यास सुरूवात केली.
अभिषेक त्यांच्या तावडीतुन सुटुन घरी पळत जात होता. त्यावेळी आरोपी करण पाटीलने त्यास रस्त्यामध्ये पकडले. आज याला खल्लास करून टाकायचा जिवंत सोडायचे नाही असे म्हणून धारदार हत्याराने अभिषेक याच्यावर वार केला.
जखमी झालेल्या अभिषेकने आरडा-ओरडा केल्यानंतर गल्लीतील लोक तेथे जमा झाला. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या हातातील धारदार हत्यारे उंचावत गल्लीतील लोकांना तुम्ही त्याला मदत केली किंवा मध्ये आला तर तुम्हाला एकेकाला मारून टाकीन असे मोठ-मोठयाने ओरडून दहशत निर्माण केली.
दरम्यान, पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी करण पाटील आणि विवेक चोरगे यांना अटक केली आहे. गुन्हयाचा तुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बेरड करीत आहेत.