Mundhwa Police Station | पुणे : मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून जमाव जमवून पोलीस चौकीत फक्त पुरष कर्मचारी असल्याचा गैरफायदा घेत महिलेने स्वत:ची साडी काढत शिवीगाळ करून पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी…
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. हा प्रकार मुंढवा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत श्रावस्तीनगर परिसरातील घोरपडी पोलीस चौकीमध्ये गुरुवारी (११ मे) रोजी दुपारी घडला आहे.
अजय दिलीप सरदार (वय २३, घोरपडी) यांच्या चौघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी तुळशीराम रासकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या मुलाने प्रेमसंबधातून विवाह केला होता. तो मुलगा खूप वाईट आहे, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून यापूर्वी त्याचा विवाह होऊन घटस्फोट झाला असल्यामुळे त्याच्या सोबतच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. या रागातून महिलेने कुटुंबीयांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. फेब्रुवारी २०२३ मध्ये हा प्रेमविवाह झाला होता.
ही बाब तिच्या कुटुंबीयांना समजल्यावर ते मुलीच्या पतीला धमक्या देत होते. मुलीच्या घरचे थेट मुलाच्या घरी जाऊन त्याला तुला सोडणार नाही, कापून टाकीन, अशा धमक्या देत होते. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी घोरपडी पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. तक्रार आल्यावर पोलिसांनी संबंधित मुलीच्या पालकांना चौकीत बोलावले होते.
मात्र यावेळी चौकीत तीन महिलाही त्यांच्या सोबत आल्या होत्या. आल्याबरोबर या सर्वांनी आमच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याची मागणी केली. आम्हाला हे लग्न मान्य नसल्याचे सांगत त्यांनी चौकीतच गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना शांत राहायला सांगितले. तसेच त्यांचे वर्तन पाहून चौकीतून जाण्यास सांगितले. त्यावेळी महिलांनी अजूनच गोंधळ करायला सुरुवात केली.
पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ…
दरम्यान, मुलीच्या आईने चौकीतच स्वतःचे कपडे काढत पोलिसांना धमकी दिली. मीच तुमच्यावर विनयभंगाची केस दाखल करते, तुम्हाला दाखवते, अशी धमकी देत गोंधळ घालायला सुरुवात केली. सोबतच्या महिलांनी पोलिसांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धाव घेतली. पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या ठिकाणी दोघेही पोलीस कर्मचारी पुरुष असल्याचा गैरफायदा घेत त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Police Transfers | सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि एसीपी नारायण शिरगावकर यांच्या अंतर्गत बदल्या