Mumbai Pune Expressway : पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (१ जून) पहाटे भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले. मुंबई वाहिनीवर झालेल्या या अपघातात तांदूळ भरलेला ट्रक, खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश होता. Mumbai Pune Expressway :

प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील कंटेनरला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की बाजूने जाणारी एर्टिगा कारही अपघातात सापडली. यानंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्यतेलाचा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. Mumbai Pune Expressway :

या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. तर लिलाबाई सस्ते (80), मुकिंदा सस्ते (56) आणि महेंद्र पाल (39) हे जखमी झाले आहेत. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. Mumbai Pune Expressway :

अपघातानंतर तांदळाच्या बॅगा आणि खाद्यतेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. Mumbai Pune Expressway :
अपघातग्रस्त वाहने आणि विखुरलेला माल हटवण्यासाठी महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशन यांनी संयुक्तपणे मदतकार्य राबवले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. Mumbai Pune Expressway :







