Mumbai News : मुंबई : बाईकच्या आरशाला धक्का लागल्याच्या रागाने २० वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
नालासोपारा येथील घटना
नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव हा २० वर्षीय तरुण रविवारी सायंकाळी आपल्या मित्रासोबत बाईकवरुन निघाला होता. याचदरम्यान दुसऱ्या बाईकवरुन ट्रीपल सीट प्रवास करत एकजण समोरुन येत होता. (Mumbai News) रोहितच्या बाईकचा आरोपींच्या बाईकच्या आरशाला चुकून धक्का लागला. यामुळे आरोपी संतप्त झाले. आरोपींनी रोहितला थांबवले आणि धक्का लागल्याचा जाब विचारून रोहित आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत रोहितचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रोहितचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींविरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai News) या घटनेनुळे नालासोपारा परिसरात खळबळ उडाली आहे. तरुण मुलाच्या अकस्मात मृत्यूमुळे यादव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : समृद्धी महामार्गावर एअर अॅम्बुलन्स सुरू करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय!