Mumbai News : मुंबई : नवी मुंबई परिसरातून एक धक्कादायक बातमी उघड होत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ऑनलाइन सेक्स रॅकेट चालविणारी टोळी उद्ध्वस्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला अटक केली असून, तिने शरीरविक्रयासाठी आणलेल्या चार मुलींची सुटका केली आहे. दोन फरार दलालांचा पोलीस शोध घेत आहेत.
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला अटक
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव फ्लावीया अहिरवार (वय ३२) असे आहे. रघु नावाच्या एका दलालाने इंटरनेटवर शरीरविक्रयासाठी मुली पुरविल्या जातील, अशी जाहिरात दिली होती. तसेच एस्कॉर्ट सर्व्हिससाठी मोबाइल नंबर दिला होता. (Mumbai News) तो दलाल ऑनलाइन सेक्स रॅकेटचालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली. हे रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर व त्यांच्या पथकाने दलालांच्या मोबाइलवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क साधून शरीरविक्रयासाठी चार मुलींची मागणी केली. मागणीला प्रतिसाद देत फ्लाविया या महिलेने ग्राहकाच्या व्हॉट्सअॅपवर नऊ मुलींची छायाचित्रे पाठवली. (Mumbai News) चार मुलींसाठी एकूण ६० हजार रुपये द्यावे लागतील, असेही सांगण्यात आले. दरम्यान, बनावट ग्राहकाने चार मुलींची निवड केली. त्यानंतर ग्राहकाला प्रिन्स इंटरनॅशनल लॉजिंग ऍन्ड बोर्डिंगजवळ बोलावण्यात आले. याप्रकरणी फरार असलेल्या दोन दलालांमध्ये रघू आणि पल्लवी या दोघांचा समावेश आहे.
बनावट ग्राहक संबंधित ठिकाणी पोहोचताच दलाल फ्लावीया रिक्षामधून चार मुलींना घेऊन आली. (Mumbai News) ग्राहकाने ठरल्याप्रमाणे सौदा पूर्ण केला. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा मारून हे ऑनलाइन सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : पाकिस्तानी दहशतवादी… मुंबई पोलीस कंट्रोल रूमला फोन; एटीएस सतर्क!