Mumbai News : मुंबई: मुंबईतील काही प्रमुख भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमक्या एका अनोळखी फोनवरून समोर आल्या होत्या. याशिवाय पुण्यातही बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. असा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवत धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी
मुंबई आणि पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमकीबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, २२ जून रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई (अंधेरी आणि कुर्ला पश्चिम क्षेत्र) आणि २४ जून रोजी पुणे येथे बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. (Mumbai News) त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते. दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आरोपीने स्फोट थांबवण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी देखील मागितली होती. (Mumbai News) दरम्यान फोन करणाऱ्याची ओळख पटली आहे. आरोपी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी आहे. आयपीसीच्या कलम ५०५(१)(बी), ५०५(२) आणि १८५ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
Mumbai News : मोठी बातमी ! लाखो वारकऱ्यांना दिलासा; विमा संरक्षण मिळणार
Mumbai News : हिंमत असेल तर आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाका : खासदार सुप्रिया सुळे