Mumbai News ; मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मराठीसह हिंदी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी स्वत:चे जीवन संपवले. उत्तम अभिनेते आणि निर्माते म्हणूनही त्यांची ओळख होती. आर्थिक तंगीमुळे नितीन देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. कर्जत येथील आमदार महेश बालदी यांनी देसाई यांच्या निधनाबद्दल मोठी माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देसाई आर्थिक तंगीचा सामना करत होते. म्हणूनच त्यांनी सकाळी एनडीए स्टुडिओमध्ये आत्महत्या केली… अशी प्रतिक्रिया बालदी यांनी दिली आहे. स्टुडिओ हा फिल्ममवर चालतो. मात्र, स्टुडिओ चालत नसल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या २ महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बातचीत झाली होती. तेव्हा देखील त्यांनी आर्थिक विवंचना सुरू आहे, असे म्हटल्याचेही बालदी यांनी सांगितले.
स्टुडिओ चालत नसल्यामुळे आर्थिक विवंचना
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, देसाई यांच्यावर २४९ कोटींचे कर्ज होते. त्यामुळे संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला होता. परंतु देसाई यांच्याकडून कर्जाची रक्कम भरली गेली नाही. कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेला जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला होता. (Mumbai News) परंतु त्याला आता सुमारे २ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्या हे प्रकरण जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.
आत्महत्या हा त्वरीत घेतलेला निर्णय नसतो. त्यामागे अनेक घटनांची साखळी असते. आता आपल्या आयुष्यात काहीही शिल्लक नाही असे सतत मनात वाटत राहणे आणि त्यानंतर ही अवस्था इतकी वाईट होणे की आत्महत्या करणे हेच एखाद्या व्यक्तीला योग्य वाटू शकते. (Mumbai News) चांगल्या विचारांपेक्षा वाईट गोष्टींचा विचार आणि स्वतःला संपविण्याचा विचार अधिक केला जातो, हेच देसाई यांच्यासोबत घडलेले असण्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञांनी दिली आहे.
नैराश्याचं शेवटचं टोक म्हणजे आत्महत्या असे सहसा अभ्यासातही म्हटलं जातं. कारण नैराश्यात असणाऱ्या व्यक्तीच आत्महत्या करणाऱ्या अधिक असतात हे अभ्यासतही सिद्ध झाले आहे. (Mumbai News) नैराश्यात असणारी माणसं ही जगाकडे नेहमीच नकारात्मक दृष्टीने पाहतात आणि त्यामुळे त्यांना जगण्यात काहीच अर्थ वाटत नाही आणि त्यांना आत्महत्या हाच एक पर्याय दिसतो, असे डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, सिनेसृष्टीत प्रवेश करण्याअगोदर नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची सिनेमा कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या सिनेमामुळे ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या सिनेमांचं त्यांनी कला दिग्दर्शन केले होते.
२० वर्षांच्या या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. (Mumbai News) नितीन देसाई यांनी ४ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार मिळवला आहे, तर ३ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शेतकऱ्यांना दिलासा, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार; सरकारचा मोठा निर्णय!
Mumbai News : मोदी-पवार एकाच व्यासपीठावर येणार? मविआमध्ये नाराजीनाट्य; मन वळविण्याचा प्रयत्न….