Mumbai News : मुंबई : अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अटक करण्याची भिती दाखवून तब्बल २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना मुलुंड पोलीस ठाण्याच्या (गुन्हे) पोलीस निरीक्षकासह हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
अटक न करण्यासाठी २५ लाखांची मागणी
पोलीस निरीक्षक भूषण मुकुंदलाल दायमा (वय -४०) आणि हवालदार रमेश मछिंद्र बतकळस (वय-४६) अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार याच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तक्रारदार यांचा सदर गुन्ह्यात अटक पूर्व जामीन रद्द झाला होता. (Mumbai News) त्यामुळे तक्रारदार यांना या तपासात मदत करण्याकरीता, गुन्ह्याचे स्वरुप कमी करण्यासाठी व अटक पूर्व जामीन रद्द झाल्याने अटकेची भिती दाखवून आरोपी लोकसेवक पोलीस निरीक्षक भूषण दायमा व हवालदार रमेश बतकळस यांनी २५ लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता. या प्रकरणात पोलीस निरीक्षक दायमा यांनी तडजोडीअंती ११ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. (Mumbai News) तक्रारदार याच्याकडून पहिला हफ्ता म्हणून २ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दायमा व बतकळस यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त विजय पाटील , अपर पोलीस आयुक्त संजीव भोळे , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त साळुंखे पाटील , पोलीस निरीक्षक विद्या जाधव व त्यांच्या सहकार्यांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : मुंबई-पुणे शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त आणि आरामदायी