मुंबई Mumbai Crime : मालमत्ता हडप करण्यासाठी आई आणि मुलाचं अपहरण करुन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात घडली आहे. (Mumbai Crime) याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. (Mumbai Crime) तर अपहरणातील महिलेचा जीव वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. (Mumbai Crime)
५ जणांवर गुन्हा दाखल
विशाल वसंत कांबळे (44 वर्ष) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विशालची आई रोहिणी वसंत कांबळे (88 वर्षे) यांना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ देसाई यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलंबित बेस्ट बसचालक मुनीर पठाण (४१, वडाळा), चालक रोहित अदमाने (४०, पवई), राजू दरवेश (४०, मीरा रोड), केअर टेकर ज्योती वाघमारे (३३, मानखुर्द) आणि प्रणव रामटेके (२५, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी कांबळे आणि त्यांचा मुलगा विशाल कांबळे हे कोल्हापुरातील मालमत्तेवरून कोर्ट कचेरी सुरू असल्याने दोघे मुंबईत आले होते. त्यानंतर आरोपींनी रोहिणी कांबळे आणि त्यांचा मुलगा विशाल कांबळे माय-लेकाचे अपहरण केले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघे माय लेक ५ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती.
दरम्यान, आरोपींनी रोहिणी कांबळे यांना सुरुवातीला राजस्थानात एका ठिकाणी डांबून ठेवले. त्यानंतर गोरेगावातील रॉयल पाम ब्लॉक सेक्टरमध्ये ठेवले. दुसरीकडे मुलगा विशाल याला मालमत्ता खरेदी-विक्रीच्या बैठकीसाठी पनवेलला नेऊन एका व्हिलामध्ये हत्या करून त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला.
याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तींचा अत्यंत गोपनीय तपास करण्यास सुरवात केली. पोलीस पथकाने एकाचवेळी वडाळा, मुंबई आणि पवई या परिसरातून दोघांना ताब्यात घेतले.
सदर महिलेच्या जीवितास धोका असल्याने आणि त्यांची सुरक्षित सुटका होणे गरजेचे असल्याने पोलीस पथक सदर ठिकाणी तात्काळ पोहचले. त्या ठिकाणी संबंधित महिलेवर पाळत ठेवण्याकरता दोन इसम असल्याचे आढळून आल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आणि त्या महिलेचा सुटका करण्यात आली.
दरम्यान, महिलेस गुंगीचं औषध दिल्याचं लक्षात आल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.