Crime : गुन्ह्यांचा तपास करण्यात आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यात पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागत असते. त्यासाठी त्यांना कित्येक वर्षे एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा, तपास करावा लागत असतो. असाच एक प्रकरण पुढे आल आहे. उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील एका आरोपीला गुन्हा केल्यानंतर दोन वर्षांनी शिक्षा देण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी एका महिलेने आपल्याच पतीचा खून केला होता. हे प्रकरण दोन वर्षे पोलिसांसाठी एक कोडच राहील होतं. अखेर एका नववीत शिकणाऱ्या मुलीने आईचा गुन्हा पोलिसांसमोर उघड केला असल्याचे समोर आले आहे. मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारे पिथौरागढ सेशन्स कोर्टाकडून आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच 50 हजार रुपये दंड किंवा अतिरिक्त पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षाही केली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी 2022 रोजी पूरण राम यांनी महसूल पोलिसात तक्रार दाखल केली होती. आपली 40 वर्षांची वहिनी सुनीता देवी हिच्यावर पती जितेंद्र रामचा जीव घेतल्याचा आरोप पूरण रामने यांनी केला होता. जितेंद्र आणि सुनीता पिथौरागढमधील दिगस गावात राहत होते. तर पूरण राम हा जवळच्या एका गावात राहत होता. 12 फेब्रुवारी रोजी रात्री भाऊ जितेंद्रच्या मृत्यूची बातमी पूरण रामला मिळाली होती. पूरण राम जेव्हा दिगस गावात पोहोचला तेव्हा त्याला जितेंद्रच्या कपड्यांवर आणि आजूबाजूला रक्ताचे डाग दिसून आले होते. हे पाहून पुरणला आपल्या भावाचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचे जाणवले.
पूरणच्या म्हणण्यानुसार, जितेंद्रच्या 15 वर्षांच्या मुलीने या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा केला आहे. जितेंद्रच्या मुलीने पूरणला सांगितलं की, तिचे वडील रात्री कामावरून घरी परतल्यावर आई आणि वडिलांमध्ये भांडण सुरू झालं होतं. त्यादरम्यान आरोपी सुनीताने दरवाजा आतून बंद केला आणि जितेंद्रला बेदम मारहाण करयला सुरवात केली. रागाच्याभरात तिने पतीचं गुप्तांग ब्लेडने कापलं. मुलगी खिडकीतून हा सगळा प्रकार बघत असताना ती वारंवार आईला दरवाजा उघडण्याची विनंती सुद्धा करत होती. परंतु, आईने दरवाजा उघडला नाही. मुली सांगत होती की, जास्त रक्तस्राव झाल्याने आपल्या वडिलांचा मृत्यू झाला.