पुणे – कॉपीराईट कायद्याच्या तरतुदीनुसार होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने बनावट पार्ट्स विरोधातील मोहिमेचा विस्तार करत पुणे येथील एका विक्रेत्याकडून पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बनावट पार्ट जप्त केले आहेत.
आरोपींविरुद्ध कॉपीराईट कायद्याच्या तरतुदीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार छाप्याच्या कारवाईदरम्यान ५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे होंडा अस्सल पार्ट्स म्हणून ब्रँड केलेले २, ४०० हून अधिक बनावट भाग जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या भागांमध्ये एअर फिल्टर, क्लच प्लेट्स, पिस्टन सिलिंडर इत्यादींचा समावेश आहे.
पोलिसांनी देवेंद्र शहा, मालक आणि मेसर्स भगवती ऑटोमोबाईलचे व्यवस्थापक चेतन बोरा यांनाही अटक केली आहे. होंडा बनावट पार्ट्सबाबत सतर्क आहे आणि रायडरच्या सुरक्षेसाठी वचनबद्धतेसह होंडाच्या विंगने विविध राज्य पोलिस विभागांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानंतर, पोलिसांनी पुणे (महाराष्ट्र), बंगळुरू (कर्नाटक), नवी दिल्ली, गाझियाबाद (यूपी), मालदा (पश्चिम बंगाल) येथे छापे टाकून २७,००० हून अधिक बनावट भाग जप्त केले आहेत.