पिंपरी : मायलेकीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी देहूरोड येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय सुरेंद्र सुतार (वय १८), शिवशंकर सुरेंद्र सुतार (वय २०, दोघेही रा. एम.बी. कॅम्प, देहूरोड ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय व शिवशंकर सुतार यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली होती. यावेळी फिर्यादीच्या आई आरोपी विजय यांच्या घरी याचा जाब विचारण्यासाठी गेल्या. त्यावेळी विजय याने त्यांच्या अंगावर जावून मारहाण केली.
आपल्या आईला मारहाण होवू नये यासाठी विजयला अडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता, विजयने त्यांना देखील मारहाण करताना गैरवर्तन करून ढकलले व पुन्हा शिवीगाळ केली. तर, दुसरा आरोपी शिवशंकरने फिर्यादी यांच्या भावाला मारहाण केली.
या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.