लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एस के साम्राज्य ग्रुप अर्थात कुख्यात गुंड शुभम कामठे टोळीतील सदस्यांना व सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या कदमवाकवस्तीतील ४ जणांना गुन्हे शाखा युनिट क्र ६ च्या पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
जिवन सूर्यकांत घाडगे (वय-२२ रा – गोसावी वस्ती, कवडी पाट, लोणी काळभोर पुणे), कुख्यात गुंड शुभम कामठे टोळीचा सदस्य (विधी संघर्ष बालक), संस्कार विलास वाघमारे (वय- २२, रा- गुजर वस्ती, टोल नाक्याजवळ, लोणी काळभोर पुणे) आणि अनिकेत सुनिल गायकवाड (वय- २१ रा- गुजर वस्ती, टोल जवळ,लोणी काळभोर पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात धारदार शस्त्रे बाळगणे व त्याचे साह्याने गून्हे करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्याची उपाय योजना म्हणून कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिसांना सूचना दिल्या होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्र ६ चे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
गस्त घालत असताना, पहिल्या घटनेत, पोलीस शिपाई सचिन पवार यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, आरोपी जिवन घाडगे हा व्हॉट्स ॲप व इंस्टाग्राम वर कोयत्या सारख्या हत्याराचे स्टेटस ठेऊन समाजात दहशत पसरवित आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जिवन घाडगे याला टोलनाका परिसरातून अटक केली.
दुसऱ्या घटनेत, पोलीस नाईक रमेश मेमाणे एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, कुख्यात गुंड शुभम कामठे टोळीचा (S.K. साम्राज्य ग्रूप) सदस्य विधीसंघर्ष बालक हा लोणी काळभोर परिसरात फिरत आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
तिसऱ्या घटनेत, पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, कुख्यात गुंड शुभम कामठे टोळीचा (S.K. साम्राज्य ग्रूप) सक्रीय सदस्य असणारा अरोपी संस्कार वाघमारे हा थेऊर फाट्या जवळ (ता – हवेली) फिरत आहे. पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून अरोपी संस्कार वाघमारे याला अटक केली आहे.
चौथ्या घटनेत, पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, कोयत्यासह फिरणारा कुख्यात गुंड शुभम कामठे टोळीचा (S.K. साम्राज्य ग्रूप) सक्रीय सदस्य असणारा अरोपी अनिकेत गायकवाड हा कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ फिरत आहे. पोलिसांनी अरोपी अनिकेत गायकवाडला तेथून अटक केली आहे. पोलिसांना त्याच्याजवळ लोखंडी पात्याचे कोयते मिळून आले आहेत.
दरम्यान, वरील चारही आरोपींच्या विरोधात लोणीकाळभोर पोलीसठाण्यात आर्म ॲक्ट कलम ४(२५) म.पो.का.क.३७(१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हेरामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिट क्रमाक ६ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्यांच्या पथकाने केली आहे.