लोणीकंद : भारती एअरटेल कंपनीच्या गोदामातून अज्ञात दोन चोरट्यांनी २० लाख ५७ हजार ७०७ रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना लोणीकंद परिसरात घडली आहे.
याप्रकरणी रमेशसिंह (वय ३८, रा. खराडी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेल कंपनीचे लोणीकंद गावाच्या हद्दीत रामनगर रस्त्यावर ‘भारती एअरटेल’ कंपनीचे गोदाम आहे. या गोदामात कॉपर वायर, ‘एबीआयओ कार्ड साहित्य ठेवण्यात आले होते.
दरम्यान, ८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान चोरट्यांनी गोदामातून कॉपर वायर, ‘एबीआयओ कार्ड’ असे २० लाख ५७ हजार ७०७ रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.