लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे एका विवाहितेचे प्राण वाचले आहे. चारित्र्याचे संशयावरुन पत्नीस जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी कोयता बाळगुन निघालेल्या एका ३० वर्षीय तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी लोणी स्टेशन चौकातून ताब्यात घेतले आहे.
आकाश बिभीषण घुले (वय-२९, रा. शिवम हॉस्पीटलच्या पाठीमागे फुरसुंगी ता. हवेली, मुळ रा. माळी गल्ली वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार शहरात शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, दंडुके, बंदुका व शरीराविरुध्द इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेशाचे भंग करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणेबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.
त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक गस्त घालीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत पोलीस शिपाई बाजीराव वीर यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर डिझाइन असलेला शर्ट घातलेला इसम त्याचे कब्जात लोखंडी कोयता बाळगुन लोणी स्टेशन चौकात थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांना सदरची माहिती देऊन त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी सदर ठिकाणी पोहोचले असता एक इसम संशयीतरित्या थांबलेला दिसुन आला. पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो तेथुन पळुन जावु लागला असता राजेश दराडे यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास थोडयाच अंतरावर पकडले. त्याला नाव व पत्ता विचारले असता त्याने वरीलप्रामाणे सांगितले. त्याची अंगझडतीमध्ये कमरेच्या मागील डावे बाजुस एक धारधार धार असलेला लोखंडी कोयता मिळुन आला. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले. पत्नीस चारित्र्याचे संशयावरुन तिचा जीव घेण्याचे इरादाने मंचर येथे निघालो आहे.
दरम्यान, पोलिसांनी हत्यारासह त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सर्तकतेमुळे आरोपी यांचे हातुन घडणारा पुढिल अनर्थ टळला तपास पोलीस हवालदार नितीन गायकवाड करीत आहेत.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, पोलीस नाईक श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, राजेश दराडे, बाजीराव वीर, नितेश पुंदे, मल्हार ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.