पुणे : हुंड्यात चारचाकी दिली नाही, म्हणून पतीने दुसरे लग्न करत पहिल्या पत्नीला तोंडी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती ईलाही ईस्माईल शेख (वय 39), सासरे ईस्माईल शेख (वय 65), दिर जावेद शेख (वय 33) व तीन महिला आरोपी (सर्व राहणार टिपू सुलतान, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या माहेर कडून चारचाकी गाडीची व दागिन्यांची मागणी केली. लग्नात काही आणले नाही, म्हणून शारिरीक व मानसिक त्रास दिला. फिर्यादी महिलेच्या नकळत पतीने दुसरे लग्न केले. याचा जाब विचारला असता आरोपीने तोंडी तीन वेळा तलाक दिला व घरातून हाकलून काढले.
यानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात महिलेने गुन्हा दखल केला असता, त्यानुसार पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.