पुणे : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याकरीता २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वडगाव मावळ येथील मंडल अधिकाऱ्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता.५) रंगेहाथ पकडले आहे. संगीता राजेंद्र शेरकर (वय ५४ , मंडल अधिकारी, मौजे शिवणे ता. वडगांव मावळ) आणि खाजगी इसम संमाजी लोहोर असे रंगेहाथ पकडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ५४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मडवली (तालुका मावळ) येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याकरीता आरोपी शेरकर यांनी २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी एका ५४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक संगीता शेरकर व खाजगी इसम संभाजी लोहोर यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. दोघांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.