Manchar Crime |मंचर, (पुणे) : विहिरीच्या आतील बाजूचे बांबू काढताना तोल जाऊन विहरीत पडल्याने ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना शिंगवे, (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. ३०) दुपारी घडली आहे.
छोटू गुज्जर (वय २८, रा. हरीपरा, राजस्थान) असं मृत्यू झालेल्या कामगार ठेकेदाराचे नाव आहे. शिंगवे येथील असणाऱ्या गाढवे मळ्यात उत्तम हरिभाऊ गाढवे यांच्या विहिरीचे रिंग टाकण्याचे काम त्यांनी हाती घेतले होते.
तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगवे ग्रामपंचायत हद्दीतील उत्तम गाढवे यांच्या विहिरीचे रिंग टाकण्याचे काम छोटू याने घेतले होते. गुरुवारी दुपारी काम पूर्ण झाल्यानंतर रिंगच्या आतील बाजूचे बांबू काढण्याचे काम तो करत होता. ते बांबू काढत असताना तोल जाऊन छोटू हा विहिरीत पडला. विहीरीत २५ ते ३० फुटावर पाणी होतं आणि पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. तो पाण्यात पडल्याने एकच आरडाओरड सुरू झाली.
याबाबत पारगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. त्याचा शोध घेण्यासाठी विहिरीतील पाणी उपसण्यासाठी मोटार लावण्यात आली. जवळपास तासाभरात त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विहिरीचे काम सुरू होते. ते काम पूर्ण देखील झाले होते. मात्र, रिंगला लावलेले बांबू काढताना ठेकदराचा तोल गेला आणि त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.
परप्रांतीय असणाऱ्या छोटू हा अशीच कामे घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करत होता आणि काही पैसे घरी पाठवत होता. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास करण्याचे काम सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Sucide News : पत्नीसह तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या ; एकास अटक
Ambegaon News : बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र थांबेना ! दबा धरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर केला हल्ला