Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! “पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण…” माजी महापौरांच्या पतीच्या कबुलीने तपासाला नवं वळण!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 October 2026, 11:46

मुंबई : ठाण्यातील बहुचर्चित शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे (राजा शिंदे) यांची तब्बल 9 तास कसून चौकशी केली. या चौकशीतुन त्यांनी मारेकऱ्यांशी पूर्वपरिचय असल्याची कबुली दिल्याने पूर्णेकर कुटुंबीयांच्या संशयाला व आरोपांना मोठा कायदेशीर आधार मिळाला असून, ठाणे गुन्हे शाखा या दिशेने अधिक पुरावे गोळा करत आहे.

या मॅरेथॉन चौकशीदरम्यान पोलिसांनी अटकेत असलेल्या सर्व मारेकऱ्यांना आणि राजेंद्र शिंदे यांना एकाच खोलीत समोरासमोर (फेस-टू-फेस) बसवून त्यांची कसून उलटतपासणी केली.पोलिसांनी या चौकशीत कॉल रेकॉर्ड्स, गुप्त बैठका आणि आरोपींच्या विधानांच्या आधारे शिंदेंवर प्रश्नांचा भडीमार केला. या समोरासमोर झालेल्या चौकशीत राजेंद्र शिंदे यांनी अटकेत असलेले पाचही आरोपी आपल्या ओळखीचे असल्याची महत्त्वाची कबुली दिली आहे.

मात्र, या हत्येच्या कटाशी किंवा या गुन्ह्याशी आपला कोणताही संबंध नाही, असा दावा त्यांनी तीव्रतेने केला आहे. आपल्या पत्नी नगरसेविका असल्याने प्रभागातील अनेक नागरिक व कार्यकर्ते कामानिमित्त भेटायला येत असतात आणि हे आरोपीदेखील त्याच कामासाठी भेटले होते, असे स्पष्टीकरण राजेंद्र शिंदे यांनी पोलिसांसमोर दिले.

दुसरीकडे, मृत प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी हत्येच्या पहिल्या दिवसापासूनच माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वडिलांच्या हत्येपूर्वी काही दिवस हे आरोपी राजेंद्र शिंदे यांच्या ‘निळकंठ’ इमारतीबाहेर फिरत असल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले होते.

 

29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमानगर येथील कार्यालयात बसलेले प्रदीप पूर्णेकर यांच्यावर पाच हल्लेखोरांनी अचानक धाड टाकून गोळीबार केला होता. त्यानंतर धारदार कोयत्याने वार करून त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने धडक कारवाई करत सुभाष उर्फ पप्या शिंदे, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू, निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ भावड्या या पाच मारेकऱ्यांना आधीच बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील पोलीस तपास आता आणखी तीव्र झाला असून नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोबाईल युजर्ससाठी महत्वाची माहिती! 1 नोव्हेंबरपासून मोबाईल रिंगबाबत मोठा बदल ; निनावी कॉल करणाऱ्यांना चाप बसणार

Thursday, 15 October 2026, 12:54

दौंडमध्ये विनापरवाना गॅस सिलिंडर वाहतुकीचा पर्दाफाश; पिकअपसह 9 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 15 October 2026, 11:53

वरवंड येथे 18 लाखांची थकबाकी मागितली म्हणून बांधकाम साहित्य पुरवठादाराला बॅटने मारहाण

Thursday, 15 October 2026, 11:47

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! “पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण…” माजी महापौरांच्या पतीच्या कबुलीने तपासाला नवं वळण!

Thursday, 15 October 2026, 11:46

यूट्यूबर हरेश गजवानी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 3 जण अटकेत, तपासाला वेग

Thursday, 15 October 2026, 11:36

बिबट्याचा थरार! दुचाकीस्वारांवर हल्ल्याचे 3 प्रयत्न; अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर थेट झडप!

Thursday, 15 October 2026, 11:31
Next Post

वरवंड येथे 18 लाखांची थकबाकी मागितली म्हणून बांधकाम साहित्य पुरवठादाराला बॅटने मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp