Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वरवंड येथे 18 लाखांची थकबाकी मागितली म्हणून बांधकाम साहित्य पुरवठादाराला बॅटने मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 October 2026, 11:47

वरवंड, ता. 15: बांधकाम साहित्य पुरवठ्याच्या व्यवहारातील 18 लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून एका व्यावसायिकाला लाकडी बॅटने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. हि घटना वरवंड (ता. हवेली) येथील शिवाजीनगर परिसरात 13 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी गणेश प्रकाश जगताप (वय 27, रा. चैताली पार्क, वरवंड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल लहूजी दिवेकर यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, जगताप हे बांधकाम साहित्य पुरवठा आणि वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांनी 2025 मध्ये राहुल दिवेकर यांच्या ‘शिव एंटरप्रायजेस’ या नावाने जेव्हीएस कोमाटरको इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीला स्वतःच्या वाहनांमधून राखेचा पुरवठा केला होता. या मालाचे पैसे कंपनीकडून दिवेकर यांच्या नावावर जमा झाल्याचे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, आपल्या मालाचे 18 लाख रुपये मिळत नसल्याने ते वारंवार पैशांची मागणी करीत होते.

जगताप यांनी पैशांच्या व्यवहाराबाबत दिवेकर यांना 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी फोन केला. त्यानंतर दिवेकर हे जगताप यांच्या दुकानात आले आणि नंतर घरी येऊन चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार रात्री सुमारे पावणेआठ वाजण्याच्या सुमारास जगताप हे पत्नी रितू यांच्यासोबत दिवेकर यांच्या घरी गेले. तेथे पैशांच्या व्यवहारावरून चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला. फिर्यादीनुसार, दिवेकर यांनी शिवीगाळ करून जगताप यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर घराबाहेर असलेली लाकडी बॅट आणून पाठीत, डाव्या खांद्यावर आणि डाव्या हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या वेळी भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या दिवेकर यांच्या आईला ढकलून दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. यावेळी जगताप यांच्या पत्नीला शिवीगाळ करून दोघांनाही घराबाहेर काढण्यात आले. तसेच जगताप यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भांडणात जगताप यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची साखळी हरवल्याचेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

 

घटनेनंतर जगताप यांनी पाटस पोलीस चौकीत धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी वरवंड येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तक्रार दाखल केली. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम118(1), 115(2), 352 आणि 351(2), (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोबाईल युजर्ससाठी महत्वाची माहिती! 1 नोव्हेंबरपासून मोबाईल रिंगबाबत मोठा बदल ; निनावी कॉल करणाऱ्यांना चाप बसणार

Thursday, 15 October 2026, 12:54

दौंडमध्ये विनापरवाना गॅस सिलिंडर वाहतुकीचा पर्दाफाश; पिकअपसह 9 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 15 October 2026, 11:53

वरवंड येथे 18 लाखांची थकबाकी मागितली म्हणून बांधकाम साहित्य पुरवठादाराला बॅटने मारहाण

Thursday, 15 October 2026, 11:47

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! “पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण…” माजी महापौरांच्या पतीच्या कबुलीने तपासाला नवं वळण!

Thursday, 15 October 2026, 11:46

यूट्यूबर हरेश गजवानी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 3 जण अटकेत, तपासाला वेग

Thursday, 15 October 2026, 11:36

बिबट्याचा थरार! दुचाकीस्वारांवर हल्ल्याचे 3 प्रयत्न; अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर थेट झडप!

Thursday, 15 October 2026, 11:31
Next Post

दौंडमध्ये विनापरवाना गॅस सिलिंडर वाहतुकीचा पर्दाफाश; पिकअपसह 9 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp