Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाहेरून दागिन्यांचं दुकान, आत मात्र वेगळाच खेळ; 22 वर्षीय तरुणीचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 5 November 2026, 8:44

पुणे: विमाननगर परिसरातील एका कॉस्मेटिक ज्वेलरीच्या दुकानात बेकायदा पदार्थांची विक्री सुरू असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघड झाला आहे. बाहेरून दागिन्यांचे दुकान दिसणाऱ्या या ठिकाणी ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर आणि गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी 22 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. अभिलाषा पंकज अहिरराव (रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी मंगळवारी विमाननगरमधील ‘क्लाउड कार्टेल’ या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, 130 ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत 2 लाख 17 हजार 100 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे आणि लालू करहे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दुकान क्रमांक 9 मध्ये तपासणी केली. दुकानात तसेच बाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीतही प्रतिबंधित वस्तू आढळल्या. पोलिसांनी सर्व साहित्य ताब्यात घेतले.

या व्यवसायासाठी विमाननगर परिसरातील आयटी कंपन्यांमधील कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण ग्राहकांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपासादरम्यान आरोपी तरुणी यापूर्वी डेक्कन परिसरात दुकान चालवत असल्याचे समोर आले. ते दुकान बंद केल्यानंतर तिने विमाननगरमध्ये कॉस्मेटिक ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, या दुकानाच्या आडून प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू असल्याचा संशय पोलिसांच्या कारवाईत उघड झाला.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

Thursday, 5 November 2026, 9:05

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

Thursday, 5 November 2026, 8:53

बाहेरून दागिन्यांचं दुकान, आत मात्र वेगळाच खेळ; 22 वर्षीय तरुणीचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Thursday, 5 November 2026, 8:44

पुण्यात बसस्थानकाचा होणार कायापालट! एसटी, मेट्रो अन् रेल्वे स्थानक एकाच छताखाली; काय आहे मेगा प्लॅन? वाचा

Thursday, 5 November 2026, 8:36

ट्रम्प यांना मोठा झटका! अमेरिकेत सत्तेचे गणित बदलले, भारताला फायदा होणार की बसणार फटका?

Thursday, 5 November 2026, 8:27

दिवाळीच्या आनंदात पावसाचा व्यत्यय? महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

Thursday, 5 November 2026, 7:44
Next Post

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp