Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्यात वीजचोरीचे दोन प्रकार उघड; महावितरणला 82 हजारांचा फटका

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 October 2026, 11:27

यवत, ता. 16 : कासुर्डी आणि ताम्हणवाडी (ता. दौंड) येथे वीजमीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे महावितरणच्या तपासणीत उघडकीस आले आहे. या दोन स्वतंत्र प्रकरणांत एकूण 8 हजार 581 युनिट वीजचोरी झाल्याचा आरोप असून, महावितरण कंपनीचे एकूण 82 हजार 760 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये दोघांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत.

युवराज सोमेश्वर ठोंबरे व सोमनाथ लक्ष्मण दरेकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महावितरणच्या यवत शाखेतील सहाय्यक अभियंता नितीन मोहन झारगड यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वीजग्राहकांच्या मीटरची आणि वीजवापराची तपासणी करण्याचे अधिकार असलेल्या पथकाने दोन्ही ठिकाणी तपासणी केली असता वीजचोरीची प्रकरणे समोर आली.

कासुर्डीतील हॉटेलमध्ये वीजचोरी

कासुर्डी येथे 20 ऑगस्ट 2026 रोजी महावितरणच्या पथकाने प्रकाश बुधाजी ठोंबरे यांच्या वीजजोडणीची तपासणी केली. या वेळी युवराज सोमेश्वर ठोंबरे यांनी वीजमीटर बायपास करून शेजारील लघुदाब वाहिनीवर काळ्या रंगाच्या वायरद्वारे आकडा टाकून हॉटेलमध्ये वीजपुरवठा घेतल्याचे तपासणीत आढळून आला आहे. हॉटेलमध्ये पंखे, टीव्ही, फ्रिज, दिवे आणि मोटार यांसारखी विद्युत उपकरणे वापरली जात होती.
जुलै 2025 ते जुलै 2026 या कालावधीत 5 हजार 428 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 30 हजार 270 रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वीजचोरीशी संबंधित पुरावे जप्त करून त्यावर पंचांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.

 

ताम्हणवाडीतही मीटर बायपास

दुसऱ्या घटनेत 27 जुलै 2026 रोजी ताम्हणवाडी येथे सोमनाथ लक्ष्मण दरेकर यांच्या वीजजोडणीची तपासणी करण्यात आली. या वेळी वीजमीटर बायपास करून दरेकरवाडी गावठाण रोहित्राच्या बॉक्समधून काळ्या रंगाच्या वायरद्वारे घरात वीजपुरवठा घेतल्याचे आढळल्याचे तक्रारीत नमूद आहे. घरामध्ये पंखे, टीव्ही, फ्रिज, दिवे आणि मोटार यांसारखी उपकरणे वापरली जात होती. ऑगस्ट 2025 ते जुलै 2026 या कालावधीत 3 हजार 153 युनिट वीजचोरी करून महावितरणचे 52 हजार 490 रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे. या ठिकाणीही वीजचोरीशी संबंधित पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

दौंड तालुक्यातील या दोन घटनांमुळे वीजमीटरमध्ये फेरफार करून किंवा अनधिकृत जोडणीद्वारे वीज वापरण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांचा पुढील तपास यवत पोलिस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये गुन्हेगारीचा हैदोस! गोळीबार, भररस्त्यात लुटमारीचे प्रयत्न; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Friday, 16 October 2026, 12:57

लोणावळ्यात बंगल्याच्या चार भिंतींत मोठा कांड! परदेशी नागरिकांना लुटण्याचा खेळ; 20 जणांचा कारनामा उघड

Friday, 16 October 2026, 12:19

शिवसेनेत मोठी खळबळ! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर भडकले; तातडीची बैठक घेत थेट दिली तंबी!

Friday, 16 October 2026, 12:09

मतदार यादीत तुमचं नाव आहे ना? पुणे जिल्ह्यात 4 दिवस विशेष शिबिर; 26 ऑक्टोबर ही अंतिम मुदत

Friday, 16 October 2026, 11:57

दौंड तालुक्यात वीजचोरीचे दोन प्रकार उघड; महावितरणला 82 हजारांचा फटका

Friday, 16 October 2026, 11:27

दुकानांचे पत्रे उचकटून घरफोड्या, अखेर पोलिसांनी डाव उधळला! वाघोलीत सराईत चोरटा अटकेत

Friday, 16 October 2026, 11:22
Next Post

मतदार यादीत तुमचं नाव आहे ना? पुणे जिल्ह्यात 4 दिवस विशेष शिबिर; 26 ऑक्टोबर ही अंतिम मुदत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp