Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदार यादीत तुमचं नाव आहे ना? पुणे जिल्ह्यात 4 दिवस विशेष शिबिर; 26 ऑक्टोबर ही अंतिम मुदत

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 16 October 2026, 11:57

पुणे : मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नोंदणी करता यावी आणि यादीतील चुका दुरुस्त करता याव्यात, यासाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत 17, 18, 24 आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे भरवली जाणार आहेत. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि प्रारूप मतदार यादीतील आपले नाव व इतर तपशील तपासावेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात 21 मतदार नोंदणी अधिकारी, 647 सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि 8,424 बूथस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. शिबिरांच्या दिवशी हे अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहून मतदारांना अर्ज भरणे, नवीन नोंदणी करणे आणि यादीतील माहिती दुरुस्त करण्याबाबत मदत करतील.

प्रारूप मतदार यादीत नाव आढळले नाही, नाव किंवा पत्त्यात बदल करायचा आहे अथवा इतर तपशील दुरुस्त करायचे आहेत, अशा नागरिकांनी आवश्यक अर्ज भरावेत. नवीन मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 6 वापरता येईल. मतदार यादीतील नावावर आक्षेप घेण्यासाठी किंवा नियमानुसार नाव वगळण्याची विनंती करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 7 भरता येतो. तर पत्ता बदलणे, वैयक्तिक तपशील दुरुस्त करणे, नवीन मतदार ओळखपत्र मिळवणे किंवा दिव्यांग मतदार म्हणून नोंद करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 8 उपलब्ध आहे.

मतदार यादीसंदर्भातील दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करावेत. पात्र नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणीची सुविधा वर्षभर उपलब्ध असल्याने ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनीही या प्रक्रियेत सहभागी व्हावे.

 

जिल्हानिहाय मतदार हेल्पलाइन आणि मदत केंद्रांचा तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Districtvoterhelpline.aspx या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मतदार नोंदणी किंवा अर्जासंदर्भात मदत हवी असल्यास नागरिक 1950 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघातील मदत केंद्रातून मार्गदर्शन घेता येईल. अधिक माहितीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिंदेसेनेत जुन्यांना नारळ, नव्यांना दसऱ्याचं सोनं! चार मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा; तरुणांना संधी, राज्यमंत्र्यांच्या बढतीचे संकेत

Saturday, 17 October 2026, 14:32

हिंजवडीत ड्रग्ज विक्रीसाठी तरुण आले अन् पोलिसांनी सापळा रचत दोघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 17 October 2026, 14:21

पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल! अभ्यासिका अन् ग्रंथालयाची तोडफोड केल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 17 October 2026, 14:14

स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल; पुण्यातील वाहनचालकांनी हे वाचाच

Saturday, 17 October 2026, 13:50

सफाई कर्मचारी पदावर पक्की नोकरी मिळणार म्हणून पैसे दिले, पण महिन्यांनंतरही नोकरी नाही; पुण्यात 6 जणांची फसवणूक

Saturday, 17 October 2026, 12:59

रात्री मॅगी खाल्ली, सकाळी एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 12:54
Next Post

शिवसेनेत मोठी खळबळ! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर भडकले; तातडीची बैठक घेत थेट दिली तंबी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp