राजेंद्रकुमार गुंड
माढा – Madha News : माढा येथील विठ्ठल प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी (Vitthal Pratishthan College of Pharmacy, Madha) येथे 8 मार्च हा जागतिक महिला दिन (Women’s Day) संस्थेचे मार्गदर्शक तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व आनंदात (celebrated) विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन
सुरूवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे डॉ.उमा पाटील व प्राचार्य सचिन जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी डॉ.उमा पाटील म्हणाले की, कॉलेजमधील मुलींनी त्यांच्या आरोग्याची व आहाराची काळजी घेतली पाहिजे. महिला घरातील सर्व कामे स्वतः करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कुटुंबाचा सांभाळ करतात. ग्रामीण भागातील मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी महिला दिनाविषयी कॉलेजमधील विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य सचिन जाधव, प्रा. नयन दिघे,सागर थोरात यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..