सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी हे वाईट नजरेने, वाईट उद्दिष्ट मनात ठेवून नेहमी शाळेत येतात. माझ्या सोबत चल, तुला काहीही कमी पडू देणार नाही, माझ्या सोबत संसार कर, असे बोलतात. तसेच यंदाच्या दिवाळीला तर असा मेसेज पाठवला की, फराळाला घरी या, घरात कोणी नाही.
या सर्व त्रासाला कंटाळून मुख्यमंत्र्यांच्या वाहनसमोर जाऊन आत्महत्या करणार आहे, अशा आशयाचे पत्र सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना राहत्या घरी सोलापुरातील एका शिक्षिकेने निनावी पत्र पोस्टाने पाठवले आहे. यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या पत्रानुसार, उत्तर सोलापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी हे वाईट नजरेने, वाईट उद्दिष्ट मनात ठेवून नेहमी शाळेत येतात. माझ्या सोबत चल, तुला काहीही कमी पडू देणार नाही, माझ्या सोबत संसार कर, असे बोलतात. तसेच यंदाच्या दिवाळीला तर असा मेसेज पाठवला की, फराळाला घरी या, घरात कोणी नाही.
या सर्व त्रासाला कंटाळून मुख्यमंत्र्यांच्या वाहनसमोर जाऊन आत्महत्या करणार आहे. अशा मजुकराचे पत्र पाठविल्याने सोलापूर जिल्हा परिषद आवारात शिक्षण खात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे ती शिक्षिका कोण आहे, त्याबाबत अजूनही माहिती समोर आली नाही. किंवा सोलापुरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली नाही.
दरम्यान, याबाबत उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता त्यांनी मला याबाबत फसविले जात आहे. मी कोणत्याही शिक्षिकेला अशी वागणूक दिली नाही. उलट काही महिन्यांपूर्वी शिक्षण खात्याविरोधात काही शिक्षक संघटनांनी मोठे आंदोलन केले होते.
गट शिक्षणाधिकारी म्हणून आंदोलनाला विरोध करत कामबंद आंदोलन केले होते. यानंतर माझ्या मागे कटकारस्थाने सुरू झाली आहेत. माझ्या विरोधात माहिती अधिकार टाकणे किंवा मला अडचणीत आणण्यासारखे प्रकार चालू आहेत. मी दोषी असेल तर मला शिक्षा द्या, असे उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी दिले.