पुणे : प्रेयसी आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून प्रियकराने एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चाकणमधून उघडकीस आली आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
निकिता कांबळे (वय. 28 ) असे हत्या करण्यात आलेल्या प्रेयसीचे नाव आहे. राम सुर्यवंशी असे प्रियकर आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम आणि निकीता एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होते. लग्न झाल्यानंतर निकीता यांनी रामशी बोलणे बंद करून त्याला दुर्लक्ष करत होत्या. निकिता बोलत नसल्याने आणि आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याने रामला विवाहित प्रेयसीचा राग आला. त्यानंतर रामने निकिताच्या घरी जाऊन रागाच्या भरात तिचा गळा चिरुन हत्या केली.
दरम्यान, आरोपी राम सुर्यवंशी याला महाळुंगे पोलिसांनी अटक केली. विवाहित प्रेयसीचा रागातून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.
या घटनेचा पुढील तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.