Lonikand News : पुणे : शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरातील चार गुंडांना दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले.
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिले आदेश
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अजय राजेंद्र माकर (रा. गोरे वस्ती, वाघोली), रोहित दत्ता मंजुळे (रा. वाघोली),आकाश राजू दंडगुले (रा. वाघोली), हर्षद कुमार शिंदे (रा. लोणीकंद) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Lonikand News) या टेळीचा प्रमुख माकर हा असून, त्याच्या साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, माकर आणि साथीदार परिसरात दहशत माजवत असल्यामुळे नागरिक तक्रार देण्यास धजावत नव्हते. यामुळे शहर आणि जिल्ह्यातून त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव लोणीकंद पोलिसांनी तयार केला होता. (Lonikand News) अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मारूती पाटील, सीमा ढाकणे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी आदींनी ही कारवाई केली.