(Lonikand Crime) पुणे : लोणीकंद (ता. हवेली) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे एका महिलेने शिक्षकाची नोकरी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. तर सुमारे १६ वर्षाच्या कालावधीत शासनाची तब्बल ४१ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी महिला शिक्षिकाच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केली.
या प्रकरणी जिल्हा परिषद विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ ( रा. चंदननगर ) यांनी फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा २ जून २००६ ते ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
संबंधित महिलेने शिक्षण ११ वी असतानाही सख्ख्या बहिणीच्या कागदपत्रांच्या आधारे १२ वी शिक्षण दाखविले आणि अन्य खोटे कागदपत्रे तयार करून लोणीकंद जिल्हा परिषद शाळेत लोणीकंदमध्ये उपशिक्षिका नोकरी मिळविली. यानंतर शासनाच्या निर्णयाचा फायदा घेऊन खोट्या कागदपत्रांच्या आधारे पुण्यात एका संस्थेत डीएडचे ही शिक्षण पूर्ण केले. याप्रकरणी लोणीकंद येथील एका तरुणाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे या महिलेबाबत तक्रार करून चौकशीची मागणी केली होती.
दरम्यान, तरुणाने केलेल्या अर्जाची दखल घेत शिक्षण विभागाने या महिलेची चौकशी केली असता हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार समजताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या महिलेविरोधात पोलीसात तक्रार देण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित महिलेच्या विरोधात लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!