लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणीकाळभोर, सोरतापवाडी, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत हातभट्टी दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तर गावठी दारू बनविणाऱ्या चौघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राहुल व्यंकट राठोड, (वय -२७), पंकाबाई व्यंकट राठोड (वय-५२), जयश्री कांतीलाल राठोड (वय ३५, रा. तिघेही काळेशिवार कॅनल जवळ, शिंदवणे, ता. हवेली) सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ, वय २६ वर्षे, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांचे व परिमंडळ ४ व ५ च्या पोलिसांची दोन वेगवेगळी पथके करून उत्पादन शुल्क विभागाकडील अधिकारी व त्यांच्या पथकातील अधिकारी यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोरतापवाडी, शिंदवणे, लोणीकाळभोर मांडाळमळा येथील अवैध गावठी हातभट्टी दारु भट्टीवर धडक कारवाई केली.
शिंदवणे येथील काळेशिवार कॅनल जवळ गावठी हातभट्टीवर कारवाई करून जमिनित खड्डे करून ४ हजार लीटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन, ४४ हजारांचे पत्र्याचे भांडे, असा मुद्देमाल पोलीसांनी जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट केला. दुस-या पथकाने मांडाळमळा, रूपनरवस्ती, लोणी काळभोर या ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी दोन पञ्याचे टाक्यामध्ये तसेच जमिनीत खड्डा करून काळे रंगाची ताडपत्री अंथरून त्यामध्ये साठवलेले अंदाजे ३ हजार लिटर गुळपाणी, तुरटी व पाणी मिश्रित असलेले कच्चे रसायन, हातभट्टीसमोर पडलेली जळावू लाकडे, पञ्याच्या टाक्या इत्यादी साहित्य पोलीसांनी जागीच नष्ट केले आहे.
दरम्यान, या कारवाईत लोणी काळभोर पोलिसांनी ८८ हजार रुपयांचा अवैध दारुसाठा व दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट केले आहे.
सदरची कामगिरी सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, वैभव मोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, बोरावके, नागलोत, साळुंखे, जाधव,राठोड, पवार, कुदळे, शिरगीरे, विर,फणसे, पुणे शहर, आरसीपी ४ व आरसीपी ५ तसेच राज्य उत्पादन शुल्क जी विभाग पुणे यांचेकडील अधिकारी व स्टाफ यांच्या पथकाने केली आहे.