लोणी काळभोर (पुणे) : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतून ताब्यात घेतले आहे.
राज पवार (रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ०८) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरीष्ठांच्या आदेशाने श्री गणेश विसर्जन बंदोबस्त निमीत्ताने गस्त घालत असताना तपास पथकातील पोलीस नाईक नागलोत यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसेच तडीपार असलेला आरोपी नामे राज पवार हा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी कवडीपाट परीसरामध्ये आला आहे.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांनी २ वर्षा करीता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हयातून तडीपार केलेले असताना, सदर राज पवार याने इसमाने कोणतीही पूर्व परवानगी न घेता पुणे शहरात प्रवेश करुन त्यांचे आदेशाचा भंग करीत लोणी काळभोर पोलीस ठाणे हददीत कवडीपाट, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर पुणे येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरोधामध्ये शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदराची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक नागलोत, जाधव, शैलेश कुदळे, निखील पवार, पुंडे यांचे पथकाने केली आहे.