हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील चायनीज दुकानावर दरोडा टाकून दुकानातील पैसे लुटणाऱ्या ६ जणांच्या टोळक्याला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
सुमित दत्ता खवले, करण संदीप चिकाने, हनुमंत सोपान हाक्के, (रा. तीघेही, सातववाडी, हडपसर), रोहन राजकुमार गायकवाड, समाधान वैजनाथ बाबळसुरे (रा. दोघेही गोंधळेनगर, हडपसर) अनिकेत गुलाब गायकवाड, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अजिंक्य सतीश कांचन (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य कांचन यांचे उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रोड या ठिकाणी लकी चायनीज सेंटर नावाने हॉटेल आहे. मंगळवारी (ता. २२) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हातात प्राणघातक हत्यार घेऊन आले. यावेळी दुकानातील ग्राहकाला मारहाण करून दहशत निर्माण केली व दुकानातील रोख रक्कम लुटून नेल्याची तक्रार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली होती.
घडलेल्या गुन्ह्याच्या अनुशंघाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी नमूद गुन्ह्यात वरील सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, आरोपींकडून अशा प्रकारच्या अजून काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.