Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : वाहतूक पोलिसांनो, उघडा डोळे बघा नीट…! लोणी काळभोरमध्ये अल्पवयींनांची ट्रिपलसह फोर सीट ‘गाडी सुसाट’

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 4 August 2023, 20:43

Loni Kalbhor News  लोणी काळभोर, ता.०४ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शालेय विद्यार्थी दुचाकीवरून ट्रिपल व फोर्थ सीट लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बिनधास्त जाताना आढळून येत आहेत. मग वाहतूक पोलीस करतात तरी काय? ‘पोलिसांनो, उघडा डोळे बघा नीट’ अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शालेय विद्यार्थी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत बिनधास्त वाहन चालवत आहेत. केंद्र शासनाने वाहतूक नियमभंग कायद्यात वाढ केली असली तरी त्याची अंमलबजावणी लोणी काळभोर शहरात होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून सर्रास नियमांची पायमल्ली केली जात आहे. (Loni Kalbhor News)

लोणी काळभोर शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन वाहनचालक करत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलामुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास पालकांना २५ हजार रुपयाचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद आहे. तरीही अनेक पालक आपल्या पाल्यांना गाडी चालवण्यास देतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते आहे.  (Loni Kalbhor News)

सध्या शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयात जाताना अल्पवयीन मुलांकडे गाडी देण्याकडे पालकांचा कल असतो. पालकांकडे पाल्याला ने-आण करण्यासाठी वेळ नसल्याने मुला-मुलींना गाडी घेऊन देतात. हल्ली ट्यूशन, कॉलेजला जाण्यासाठी सोपे जावे म्हणून गाडी घेऊन देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बहुतांश मुला-मुलींकडे अशा गाड्या दिसतात.  (Loni Kalbhor News)

 

दरम्यान, आपल्या पाल्याचा हट्ट पुरविण्यासाठी अथवा आपल्यावरील जबाबदारी झटकण्यासाठी पालक आपल्या मुला-मुलींना गाडी घेऊन देतात. काही गाड्यांचा वेग अधिक असल्याने ही मुले बऱ्याचवेळा गाडी वेगाने चालवतात. ऐनवेळी काही घडल्यास वेग नियंत्रित करण्याची क्षमता नसल्याने अपघात होतात. त्यामुळे अशा अपघातांना मुख्यत: पालक जबाबदार असतात.  (Loni Kalbhor News)

लोणी काळभोर परिसरात रोज घुमतो बुलेटचा कर्कश आवाज

अलीकडे कर्णकर्कश व चित्र-विचित्र आवाज करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. बुलेटला जास्त आवाज करणारे सायलेन्सर बसविले जातात. बुलेटच्या कर्णकर्कश आवाजामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांवर धडकी भरण्याची वेळ आली आहे. बुलेटचालक जोरजोरात व अचानक फटाक्यांचे आवाज काढतात. त्यामुळे वयस्कर मंडळी व लहान मुले या आवाजाने घाबरून जातात. (Loni Kalbhor News)

पोलिस दिसताच ‘यू-टर्न’

सुसाट वेगाने जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना एखाद्या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिस थांबलेले दिसताच किंवा नाकाबंदी करून पोलिस वाहनांची तपासणी करत असल्याचे दिसल्यास तत्काळ ही मुले जागेवर ‘यू-टर्न’ मारताना दिसतात. यासाठी अचानक गाडीचा वेग कमी केला जात असल्याने गाडी घसरून किंवा मागे असणारी गाडी धडकल्याने अपघात होण्याचाही धोका आहे. (Loni Kalbhor News)

पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई कधी?

लोणी काळभोर परिसरात वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा केव्हा उगारणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.  (Loni Kalbhor News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Big Breaking News : पुणे जिल्हा हादरला ! तासाभराच्या अंतरात दोन अल्पवयीनांची आत्महत्या ; एक कदमवाकवस्ती येथील तर दुसरी तरडे येथील मुलगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.