Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: ‘आखाड पार्टी’त तडीपार गुंडाला बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 10 August 2026, 16:54

लोणी काळभोर, ता. १० : तडीपार असलेल्या युवराज गणेश भिसे याच्यावर लोणी काळभोर येथील महादेव मंदिराच्या पाठीमागील शेडमध्ये जुन्या वादातून चौघांनी मारहाण केल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यावेळी कार्तिक जाधव याने दगडाने डोक्यात मारल्याने दुखापत झाल्याचा आरोप भिसे याने केला आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्याच्या मित्रालाही ठोसे-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

युवराज गणेश भिसे (वय २१, व्यवसाय रिक्षाचालक, रा. लोणी काळभोर) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार्तिक अनिल जाधव, प्रज्वल संदीप शिंदे, नरेश ससाणे आणि दादा पाखरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी युवराज भिसे हा आईसोबत राहतो. वडिलांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले असून, रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्याला तडीपार करण्यात आल्याने तो नांदेड येथे मित्राकडे राहत होता आणि तेथे फरशी बसविण्याचे काम करीत होता.

७ ऑगस्ट रोजी त्याच्या आईने प्रकृती ठीक नसल्याचे सांगून भेटण्यासाठी घरी येण्यास फोन केला. त्यानंतर तो प्रवास करून पुण्यात आला. पुढे त्याचे मामा कृष्णा म्हात्रे यांनी महादेव मंदिराच्या पाठीमागील शेडमध्ये ‘आखाड पार्टी’ असल्याचे सांगितले. त्यानुसार ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भिसे हा शेडमध्ये जेवण बनविण्यासाठी गेला होता. तेथे मामा आणि त्यांचे मित्र जेवण तयार करीत होते. त्यावेळी कार्तिक अनिल जाधव, प्रज्वल संदीप शिंदे, नरेश ससाणे आणि दादा पाखरे हे चौघे तेथे आले.

जुन्या वादाचा राग; ठोसे-बुक्क्यांनी मारहाण

चौघांनी जुन्या वादाचा राग मनात धरून त्याला ठोसे-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कार्तिक जाधव याने तेथे पडलेला दगड उचलून भिसेच्या डोक्यात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेळी भांडण सोडविण्यासाठी त्याचा मित्र बाळा भांड पुढे आला असता, त्यालाही चौघांनी ठोसे-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत भिसे याने म्हटले आहे.

 

दरम्यान, भिसे याने आपण तडीपार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे तो लोणी काळभोरमध्ये कोणत्या कारणाने आला आणि त्याला तडीपार आदेशाच्या कालावधीत प्रवेशाची कोणती परवानगी होती का, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे लोणी परिसरात पुन्हा एकदा जुन्या वादातून होणाऱ्या मारामारीचा मुद्दा चर्चेत आला असून, या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते आणि चौघांमध्ये पूर्वी कोणता वाद झाला होता, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. भिसे याच्या तक्रारीवरून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! परवाना मंजूर करण्यासाठी उत्पादन शुल्क निरीक्षकाने मागितली २२ लाखांची लाच; भ्रष्ट अधिकारी ACBच्या जाळ्यात

Monday, 10 August 2026, 21:13

पुणेकरांनो सावधान! उद्या शहरात तिरंगा रॅलीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Monday, 10 August 2026, 20:59

‘ह्यांची पोरगी सासरी नीट नांदत नाही’ रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; ‘मी खून केला’ म्हणाला अन्….

Monday, 10 August 2026, 20:03

राष्ट्रवादीच्या ८ खासदारांचं मोदींसोबत २५ मिनिटं खलबतं! एका बाजूला सत्ताधारी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा, तर दुसऱ्या बाजूला बंद दाराआड बैठक

Monday, 10 August 2026, 19:08

लोणी काळभोरमध्ये ‘पोलीस मित्र’ बनले आरोग्यदूत; १०० हून अधिक कुटुंबांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ

Monday, 10 August 2026, 18:28

WagonR मधून आले, जबरदस्तीने गाडीत बसवत अपहरण, दारू पाजली अन्… पुण्यातील व्यवस्थापकाच्या अपहरणात धक्कादायक खुलासे

Monday, 10 August 2026, 18:14
Next Post

निवासी वसतिगृहात ६ विद्यार्थिंनींसोबत घडलं भयंकर! रात्रीच्या अंधारात सापाने घेत बळी; उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.