विशाल कदम
Loni Kalbhor : लोणी काळभोर : उरुळी देवाची (ता. हवेली) गावाच्या स्मशानभूमीजवळील ओढ्याजवळ खासगी पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू ठेवण्यासाठी तलवारीचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या सनी शेवाळेसह त्याच्या २ साथीदारांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली आहे. हे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ‘मोक्का’ हि ६६ वी कारवाई आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ६६ वी कारवाई
सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे (वय-26 रा. उरळी देवाची, ता. हवेली), प्रसाद बापुसाहेब भाडळे (वय-23 रा. उरळी देवाची), समीर बाबुलाल जमादार (वय-23 रा. मंतरवाडी, उरळी देवाची) अशी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. (Loni Kalbhor) याप्रकरणी अमोल रत्नाकर वाजे (वय ४०, रा. फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाजे हे खासगी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करत होते. आरोपी सनी शेवाळे हा त्यांच्याकडे आला आणि आरोपीने तलवारीचा धाक दाखवून वाजे यांना उभे चिरण्याची धमकी दिली. तसेच वाजे यांना पाईपलाईनचे काम चालू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली.
त्यानंतर आरोपी प्रसाद भाडळे व त्याच्या साथीदाराने वाजे यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी तेथे लोक जमले होते. तेव्हा आरोपी सनी शेवाळे याने हातातील तलवार व दांडके हवेत फिरवत ‘आम्ही इथले भाई असून, कोणी मध्ये आले तर कोणालाही जिवंत सोडणार नाही, (Loni Kalbhor) अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी अमोल वाजे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सनी शेवाळेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सनी शेवाळेसह त्याचे दोन साथीदार प्रसाद भाडळे व समीर जमादार याला अटक केली होती.
दरम्यान, आरोपी सनी उर्फ मृणाल मोहन शेवाळे याने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान करणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. (Loni Kalbhor) आरोपीवर कायद्याचा वचक बसावा. व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सनी शेवाळेसह त्याच्या २ साथीदारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमान्वये प्रस्ताव तयार केला.
त्यानंतर हा प्रस्ताव उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. (Loni Kalbhor) या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सनी शेवाळेसह त्याच्या २ साथीदारांवर ‘मोक्का’ची कारवाई केली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार , पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, सर्वेलन्स अंमलदार संदीप धनवटे, तेज भोसले, मंगेश नानापुरे व संदीप धुमाळ यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : लोणी कॉर्नरजवळ टेम्पो-पिकअपचा अपघात; अपघातानंतर टेम्पोमधील विटा रस्त्यावर