Lonavala Crime | लोणावळा : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पवनाधरण परीसरात मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा पवना धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फांगणे गावच्या हद्दीत घडली आहे.
मुंबई परळ येथील नऊ युवक आणि नऊ युवती असे एकूण १८ जण दुपारी पवना धरण परिसरात पर्यटन व फिरण्यासाठी आले होते. दरम्यान पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्या पैकी एक तरुण धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्यानंतर तरुणाची शोधमोहीम सुरु होती. अखेर आज मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले.
साहिल विजय सावंत (वय १८, रा. परळ, मुंबई) असे पवना धरणात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच मावळातील वन्यजीव रक्षक समिती व खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या सर्वांच्या संयुक्त शोध मोहिमेला यश आले.
माहितीनुसार, मुंबई परळ येथील नऊ युवक आणि नऊ युवती असे एकूण १८ जण दुपारी पवना धरण परिसरात पर्यटन व फिरण्यासाठी आले होते. हे सर्वजण पवनाधरण पाणलोट क्षेत्रातील सांगणे गावच्या हद्दीत पवना धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. हा धरण परिसर खोलगट असल्याने पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्या पैकी साहिल याला येथील धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.
साहिल बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत मदतीची मागणी केली. आरडाओरड ऐकून परीसरात असलेल्या टेंट व्यवसायिक व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर साहिलचा मृतदेह मिळाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime : घराचे कुलूप न तोडता चोरी ; दीड लाखांचे दागिने लंपास, असा लागला तपास..!
Pune Good News : पुणे ठरले राज्यातील पहिलं तर देशातील दुसरं ;हरित शहर
वंदे मातरम संघटनेच्या वतीने ‘शहीद बलिदान पुरस्कारां’चे वितरण