पुणे – लोणावळ्यात अल्पवयीन मुलीवर नात्यातील युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
शंकर पानसिंग बहाद्दूर थापा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नेपाळ येथून लोणावळ्यात नातेवाईकांच्या घरी एक मुलगी आली होती. मोठ्या विश्वासाने ती आणि तिचा सात वर्षीय भाऊ हा आरोपी युवक शंकर पानसिंग बहाद्दूर थापा याच्यासोबत मार्केटमध्ये गेले. यावेळी आरोपी बहाद्दूर थापा याने एका निर्जनस्थळी मुलीला नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर भेदरलेल्या अवस्थेतच मुलीने घर गाठलं आणि तिने हा सर्व प्रकार घरातील लोकांना सांगितला.
दरम्यान, याप्ररणी मुलीच्या घरच्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावरून पोलिसांनी आरोपी शंकर पानसिंग बहाद्दूर थापा याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.