Lonikand News : पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीबरोबर तब्बल ३ वर्ष शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिला सोडून दुसर्याच तरुणीबरोबर लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Lonikand News)
पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुंढवा येथील एका २१ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओमकार चंद्रकांत गायकवाड (वय २१, रा. संतनगर, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.(Lonikand News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार गायकवाड याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखविले होते. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना वाघोलीतील ब्लु इन लॉज व इतर वेगवेगळ्या लॉजवर नेले. व सन २०२० पासून १ जुलै २०२३ पर्यंत फिर्यादीसोबत अनेक वेळा शारीरीक संबंध ठेवले.(Lonikand News)
दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीला लग्नाविषयी विचारले असता, आरोपीने वेळोवेळी टाळाटाळ केली. आणि आरोपीने २७ जून रोजी दुसर्या तरुणीबरोबर विवाह करुन फसवणुक फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे.(Lonikand News)
याप्रकरणी ओमकार गायकवाड यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भदे करीत आहेत.(Lonikand News)