पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी मोठी कारवाई केली करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दोन्ही ट्रकमधून दारू गोव्यातून निघून पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात होते. पोलिसांना या प्रकाराचा संशय येऊ नये म्हणून आरोपींनी शक्कल लढवली होती. त्यांनी ट्रकभर डांबराच्या गोळ्या पसरवून ठेवल्या होत्या.
मद्य साठ्यातील एखादी बॉटल फुटली किंवा लीक होऊन वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोपींनी संशय येऊ नये म्हणून त्यांनी हे कृत्य केले.
मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिताफीने पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणाहून त्याना अटक केली. या कारवाईत तब्बल २००० पेक्षा जास्त दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. सात आरोपींपैकी काही जणांवर या आधी देखील अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.