पुणे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा पुण्यातील एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलतानाचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून, अज्ञाताने तिच्या नावाने बनावट खाते काढून हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
याप्रकरणी गौतमी पाटील यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर तिच्या २६ वर्षीय सहकारी तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी इन्स्टाग्रामवर खातेधारक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील यांचा कपडे काढतानाचा व्हिडिओ एका अज्ञात व्यक्तीने गुपचूप काढाला. त्यानंतर तो व्हिडिओ गौतमी पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते काढून अपलोड करण्यात आला. तसेच, तो व्हायरल केला गेला. अज्ञाताने इन्स्टाग्रामसोबत व्हॉट्सऍपवर देखील तो व्हिडिओ टाकून प्रसारित केला. हा प्रकार पाटील यांच्या सहकारी तक्रारदार यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
दरम्यान, प्रसिद्ध लावणी नृत्यांगनाचा अश्लिल व्हिडिओ काढून बदनामी करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेटकरी करत आहेत. अनेक नेटकरी गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ देखील उतरले असून, ती चुकीच डान्स करत होते हे नक्की खर आहे त्यावर तिच्यावर बंदी घालण्यात यावी (तिने चूक मान्य केली आहे).
मात्र, आज तिच्यावर नक्कीच अन्याय झाला आहे आणि पोलिस अधिकारी आणि सरकार नकीच या गुन्हेगारला शोधून काढतील’ अशा आशयाच्या पोस्ट अनेक नेटकऱ्यांनी आपल्या वॉलवर केल्या आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल केल्याच्या निषेध देखील नोंदविला असून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहेत.
प्रथमच गौतमीच्या समर्थनार्थ नेटकरी उतरले…!
अश्लील नृत्यामुळे आतापर्यंत अनेकदा नेटकऱ्यांनी अनेकदा गौतमीला ट्रोल केले होते तर काहींनी तिचे समर्थन देखील केले होते. मात्र, जेव्हा व्हिडीओ बाहेर येवून व्हायरल होण्यास सुरुवात झाली, तेव्हा एक स्त्री म्हणून तिच्या समर्थनार्थ देखील मोठमोठे इन्फ्ल्यूनसर देखील उतरले. यामुळे एखाद्या स्त्री कलाकारासाठी सोशल मीडियावर असा ट्रेण्ड प्रथमच पाहण्यास मिळाला आहे.