बारामती : मोरगाव (ता. बारामती) परिसरात जमीन जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधीकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दौंड न्यायालयाने दिले आहेत.
पुण्याचे सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, फौजदार पद्माराज गंपले आणि राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर यांच्यावर कलम ४२०, ४६४, १२० ब, १९१,१९२, १९ अशा विविध गंभीर कलमानुसार यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर भाऊसाहेब पाटील यांनी बारामती सत्र न्यायालयात धाव घेतली व पुनरिक्षण अर्ज करून दौंडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीस स्थगितीची मागणी २८ सप्टेंबर रोजी केली. याध्ये अॅड अमर काळे यांनी भाऊसाहेब पाटील यांच्या वतीने बाजू मांडली.
मात्र, बारामती सत्र न्यायालयाने या प्रकरणात दौंडच्या न्यायालयाने नव्याने कोणतेही आदेश देऊ नयेत असा आदेश बारामती सत्र न्यायालयाने दिला आहे. अर्थात यवत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासास मात्र स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.